Ad will apear here
Next
‘नापास म्हणजे आयुष्यात अपयशी नव्हे’

रत्नागिरी : ‘विद्यार्थी नापास झाला की त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम नातेवाईक, शेजारी करतात. मग व्यवस्थेलाही दोषी ठरवले जाते. नापास म्हणजे आयुष्यात अपयशी नव्हे, ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मकता वाढवू नका. अपयशाची कारणे शोधून यश मिळवा. स्वराज्य संस्था सकारात्मकता निर्माण करून समाज घडवण्याचे कार्य करत आहे,’ असे प्रतिपादन कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी केले.

स्वराज्य संस्थेच्या वतीने (कै.) आर. एस. सुर्वे अभ्यासवर्गातील शिक्षकांचा गौरव कार्यक्रम सात ऑक्टोबरला पटवर्धन हायस्कूल येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, स. रा. देसाई अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य मंजिरी साळवी, कल्याण येथील परिवहन अधिकारी संजय ससाणे, सुर्वे यांचे सुपुत्र संजीव सुर्वे, दूरदर्शनचे सहायक संचालक जयू भाटकर, कन्या पद्मा भाटकर, स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र शिवगण, मरीनर दिलीप भाटकर आणि सुर्वे कुटुंबिय उपस्थित होते.



डॉ. शिंदे म्हणाले, ‘स्वराज्य संस्थेने राबवलेला वर्ग खरोखरच स्तुत्य आहे. शिवाय आज सफाई कर्मचार्‍यांचा सत्कार केला आणि १०३ वर्षीय वांदरकर गुरुजींचा सत्कार माझ्या हस्ते झाला हे माझे भाग्य. मीसुद्धा एक पोलिस हवालदाराचा मुलगा. बीएस्सीला असताना मला १४ किमी चालत कॉलेजला जावे लागत होते. शाळेतील जाधवर नावाच्या शिक्षकांनी माझ्या वडिलांना सतत पत्र पाठवले आणि देवानंदला शिकायचे आहे, त्याला शिकू द्या, असे सकारात्मक विचार पेरले. आई-वडिलांमुळेच मी पुढे शिकू शकलो.’

‘या अभ्यासवर्गासाठी नगरपालिकेने शाळा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या आठ वर्षांत येथून ३०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नववीपर्यंत परीक्षेत नापास झालेल्या मुलांसाठी मार्गदर्शन केले जाते,’ असे जितेंद्र शिवगण यांनी सांगितले.

या अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांना विनामोबदला शिकवणारे शिक्षक नितीन मुझुमदार, सुवर्ण चौधरी, सोनाली डाफळे, दिपाली डाफळे, कुशल जाधव, शाल्मली गाडेकर, पल्लवी पवार, अपेक्षा नागवेकर-पाटील यांचा गौरव करण्यात आला; तसेच सफाई कामगार विजय कांबळे आणि वंदना शिंदे, वांदरकर गुरुजी यांचाही सन्मान करण्यात आला.



या अभ्यासवर्गामार्फत रत्नागिरीत रात्रशाळा व व्यावसायिक शिक्षण वर्ग सुरू करण्याचा विचार मरीनर भाटकर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘बोटीवरील नोकरीत स्थानिक कमी आहेत. त्यामुळे समुद्रातले अभ्यासक्रम शिकवून तरुणांना रोजगार देता येईल. सुर्वेकाका हे इंजिनीअरिंग जगले. लेलँडचे इंजिन बोटीला लावून बोटही चालवली. वालचंद कॉलेजला मी शिकत होतो तेव्हा सुर्वेकाका सांगलीचे आरटीओ होते.’

कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ससाणे म्हणाले, ‘सुर्वे हे हिर्‍याला पैलू पाडणारे व प्रशासकीय गुरु अशा आठवणी सांगत उजाळा दिला. सांगली आरटीओ कार्यालयात नोकरीच्या पहिल्याच दिवशी आर. एस. सुर्वे यांनी वडिलांनी आजपासून मी संजयचा पालक असे सांगितले. त्यांची कठोर शिस्त, प्रशासकीय मार्गदर्शन यामुळेच आज वरच्या पदावर पोहाचलो.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZUEBT
 Academic success is a yardstick , it can be a tool . One should not
overestimate its Its importance . There are many activities for which
academic education is not even available .
Similar Posts
राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत गणेशगुळ्याचा संघ विजेता रत्नागिरी : कल्याण ब्राह्मण सभा संघातर्फे कै. अरुण काणे स्मृती क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील वीर सावरकर संघाने अलिबाग-पेण संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. २१ हजार रुपये व चषक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. अंतिम सामन्यात सामनावीर व मालिकावीराचा मान वीर सावरकर संघाचा कप्तान सौरभ फडके याने पटकावला
सैन्यदलांच्या सुसज्जतेबद्दल व्याख्यान कोल्हापूर : ‘पुढारी’कार पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत ‘सैन्यदलांची सुसज्जता आणि संरक्षण उत्पादनातील संधी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मूळचे कोल्हापूरचे असलेले आणि विशिष्ट सेवा पदक व अतिविशिष्ट सेवापदक मिळवलेले निवृत्त एअर मार्शल अजित शं. भोसले हे व्याख्यान देणार आहेत
शिवाजी विद्यापीठाचा एनडीज् आर्ट वर्ल्डसोबत सामंजस्य करार कोल्हापूर : ‘चित्रपटसृष्टीला विविध २८ प्रकारच्या कलाकौशल्यांची गरज असते. या सर्व कलाप्रकारांत कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाला संधी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. हे मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठासमवेत झालेला सामंजस्य करार अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय ख्यातीचे
कुलगुरू डॉ. शिंदेंनी औरंगाबाद विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला होता. हा कार्यभार त्यांनी आज (चार जून २०१९) स्वीकारला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language